‘नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा’ म्हणणारे काँग्रेस नेते राजा पटेरियांना अटक

‘नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा’ म्हणणारे काँग्रेस नेते राजा पटेरियांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे.

राजा पटेरिया यांनी वक्तव्य केलं होते की, जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे “नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील; धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे,” असे वक्तव्य त्यांनी केलं.

तसेच गुन्हा दाखल होताच त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा हत्‍या किंवा ह‍िंसेत विश्वास नाही. मला माझ्या वक्तव्यातून मोदींचा पराभव करावा लागेल असं सांगायचं होतं”.असे त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com