Sanjay Nirupam
Sanjay Nirupam

अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम नाराज; म्हणाले, "जागावाटपाची बैठक..."

संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांची उमेदवारी मागे घेण्याची मागणी केलीय.
Published by :

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबसाठी मतदारसंघात अमोल किर्तीकर यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली. परंतु, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांची उमेदवारी मागे घेण्याची मागणी केलीय. अमोल किर्तीकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम नाराज असल्याचं समोर आलं आहे. "जो पर्यंत महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक चालू आहे, मतदारसंघातील जागेचा अंतिम निर्णय झालेला नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांनी उमेदवार घोषित करणे योग्य नाही", असं निरुपम यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

"अमोल निष्ठेनं लढतो आहे. अमोलच्या पाठीमागेही चौकशीचं शुक्लकाष्ट लावण्याच काम चालूच आहे. सर्व दिवस सारखे नसतात. आज तुम्ही आमच्या मागे लागलेले आहात. जे जे लोक आमच्या शिवसैनिकांना त्रास देत आहेत, त्यांना आमचं सरकार आल्यावर उत्तर दिलं जाईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

यावर प्रत्युत्तर देताना संजय निरुपम म्हणाले, "जो पर्यंत महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक चालू आहे, मतदारसंघातील जागेचा अंतिम निर्णय झालेला नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांनी उमेदवार घोषित करणे योग्य नाही." संजय निरुपम यांनी किर्तीकर यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केल्याने आता उद्धव ठाकरे गट यावर काय प्रत्युत्तर देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com