Admin
ताज्या बातम्या
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसकडून 'या' दिवशी मशाल मोर्चा निघणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. अशातच, राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 11 एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले.राज्यभरात महाविकास आघाडीच्या16 सभा होणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.