विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याच पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना दिलेला अल्टीमेटम आज संपणार आहे. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा पत्र काढण्याचे अल्टिमेटम दिले होते. काँग्रेस हायकमांड आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com