आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन
Admin

आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन

आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे. या तीन दिवसांच्या अधिवेशनात आर्थिक, राजकीय, कृषी, अशा विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. हे तीन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे.

26 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकाअर्जुन खर्गे यांचे भाषण होणार आहे. खर्गेंच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे. उद्या (25 फेब्रुवारी) आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय विषयांचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. तर 26 फेब्रुवारीला कृषी आणि किसान कल्याण, युवा रोजगार, शिक्षा आणि या विषयांवरील प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com