Congress Latest News
Congress Spoeksperson ListGoogle

भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही केली प्रवक्त्यांची यादी जाहीर; 'या' १५ नेत्यांना दिली जबाबदारी

भाजप पाठोपाठ आता काँग्रेसनेही प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १५ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाना पटोले,विजय वडेट्टीवार,विश्वजीत कदम या प्रमुख नेत्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे
Published by :
Naresh Shende
Published on

BJP vs Congress : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. भाजप पाठोपाठ आता काँग्रेसनेही प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १५ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाना पटोले,विजय वडेट्टीवार,विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांनाही प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने एक परिपत्रक काढून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या पत्रकात काँग्रेस कमिटीनं म्हटलंय, सत्ताधारी पक्षाकडून फेक नरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहेत. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नेते आणि प्रवक्त्यांवर पत्रकार परिषद आणि मीडिया बाईटची जबाबदारी दिली आहे.

'या' नेत्यांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी

१) नाना पटोले

२) विजय वडेट्टीवार

३) बाळासाहेब थोरात

४) पृथ्वीराज चव्हाण

५) माणिकराव ठाकरे

६) सतेज उर्फ बंटी पाटील

७) आरिफ नसीम खान

८) डॉ. नितीन राऊत

९) चंद्रकांत हंडोरे

१०) यशोमती ठाकूर

११) अमित देशमुख

१२) विश्वजीत कदम

१३) अतुल लोंढे

१४) सचिन सावंत

१५) चरणसिंग सप्रा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com