Navnath Ban : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; नवनाथ बन म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Navnath Ban) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका केली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. भाजपकडून सपकाळांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.
याच पार्श्वभूमीवर आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा आहे यावर विधानसभेच्या निवडणुकीला शिक्कामोर्तंब केलं आहे. देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत. म्हणून जनतेनं त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे."
"हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळे अशा पद्धतीने प्रसिद्धीसाठी टीका करत आहेत. काँग्रेसची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ जबाबदार आहेत." असे म्हणत नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Summery
हर्षवर्धन सपकाळांकडून फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका
'हर्षवर्धन सपकाळांची टीका म्हणजे वैचारिक दिवाळखोरी'
सपकाळांच्या टीकेवर नवनाथ बन यांचा हल्लाबोल
