Mumbai NMC Election 2025 : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; प्रभारी रमेश चेन्नीथला यांची घोषणा

Mumbai NMC Election 2025 : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; प्रभारी रमेश चेन्नीथला यांची घोषणा

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) काँग्रेसने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार

  • मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा

  • प्रभारी रमेश चेन्नीथला यांची घोषणा

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) काँग्रेसने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी आजच्या मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) एकदिवसीय शिबिरात घोषणा केली आहे. स्वतंत्र पालिका निवडणूक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले. मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथाला यांनी ही घोषणा केली.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडलं.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासोबत आम्ही युती कायम राहिली आहे, त्यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला बिहारच्या निवडणुकीवर (Bihar Election) भाष्य करतांना म्हणाले की, “हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला असून, याबाबत लोकांमध्ये जाऊन जागृती करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास होता विरोध गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात आठ ते नऊ वेळा भेट झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू आगामी निवडणुका एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंचा पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने त्यांचा मनसेला मविआत घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र काँग्रेसने (Congress) त्याला विरोध दर्शविला. पंरतु, आता काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com