Congress Party : ठाकरे युतीनंतर काँग्रेसचा मोठा निर्णय!मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावरच
ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस 227 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेसने महादेव जानकरांच्या रासपसोबत आघाडी जाहीर केली असली, तरी मुंबईत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, “मुंबईत ज्या जागांवर काँग्रेस लढू इच्छित होती, त्याच जागांवर ठाकरे गटाची शिवसेनाही इच्छुक होती. त्यामुळे आमचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.”
यावेळी त्यांनी सांगितलं की, मुंबईत आम्हला ज्या जागांवर लढायचं होत त्याच जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील लढायचं असल्याने आम्ही वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांचा भावना लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, तुम्ही दरवेळी आघाडी करता, आम्ची लढण्याची इच्छा आहे. आघाडी केल्यामुळे आम्हाला कमी जागा मिळतात. त्यामुळे आमची कोंडी होते. त्या भूमिकेतून आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले, “आमचं निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आघाडी केल्यामुळे काँग्रेसला कमी जागा मिळतात आणि कार्यकर्त्यांची कोंडी होते. त्यामुळे यावेळी स्वतंत्रपणे ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.” या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार असून ठाकरे बंधूंची युती, काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय आणि रासपसोबतची आघाडी यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
