चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने ठेकेदार उद्या पासून कामाला करणार सुरुवात
निसार शेख|चिपळूण: चिपळूणकरांच्या जिव्हाळ्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या रखडलेल्या 'हायटेक' बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागर विधानसभा तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी सातत्याने आवाज उठविण्यानंतर काही दिवसापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. मात्र, चार पाच दिवसात हे काम पुन्हा थांबले.
त्यामुळे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी एस टी डेपोच्या अधिकारी यांना धारेवर धरले आणि आठ दिवसात काम सुरू झाले नाही तर १५ डिसेंबर ला चिपळूण आगारात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार आगारातील अधिकारी वर्ग यांना जाग आली आणि चिपळूण येथील शासकीय विश्रागृहावर तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या उपस्थित अधिकारी ,ठेकेदार यांच्यात बैठक झाली आणि उद्या पासून कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी पत्र एस टी विभागाचे रत्नागिरी जिल्हा विभागीय अभियंता सुरेश मोहिते यांनी दिल्यावर सावंत यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले.. त्यामुळे अखेर तालुका प्रमुख संदीप सावंत यांच्या सुरुवातीपासूनच लढ्याला यश आल्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर पोटठेकेदाराने कामाला सुरुवात केली. मात्र, नंतर या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले ते अजूनही रखडलेले आहेच. दरम्यान, ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघ तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी या बस स्थानकाच्या कामाला वेग मिळावा, यासाठी आवाज उठवला. यामध्ये बस स्थानकाच्या कामासाठी श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी प्रशासनाकडून योग्य ते आश्वासन दिले होते. तरीही या कामाला वेग मिळाला नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच संदीप सावंत यांनी या स्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास बस स्थानकाच्या आवारात गुरे ढोरे बांधून आंदोलन करू असा इशारा दिला होता.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यकारी अभियंता मुंबई प्रदेश या कार्यालयाने १९ जुलै २०२२ रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण करून सातारा येथील ठेकेदाराने ३ कोटी ४२ लाख ९१ हजार ५२ हजार रुपयांत या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम घेतले. मात्र ठेका घेऊन चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या ठेकेदाराने अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही. ही बाब लक्षात येताच संदीप सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत पंधरा दिवसात या ठेकेदाराने काम न केल्यास या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा व नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी करावी लागेल, असा इशारा दिला होता.
त्यानुसार ठेकेदाराने चिपळूण हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली पहिल्या टप्प्यात या बस स्थानकाच्या आवारात गवत व अस्वच्छता निर्माण झाली होती. ती ठेकेदारांच्या कामगारांनी हा परिसर स्वच्छ केला आहे. आता पुढचे काम वेगात सुरू होणार असे वाटत असताना पुन्हा काम बंद झाले त्यामुळे तालुका प्रमुख संदीप सावंत यांनी पुन्हा आवाज उठविला आणि १५ डिसेंबरला गुरे ढोरे चिपळूण बस स्थानकात बांधून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतात राज्य परिवहन विभागाच्या अधिकारी यांना जाग आली आणि त्यांनी चिपळूण येथील शासकीय विश्रागृहावर तालुका प्रमुख संदीप सावंत यांचा अधिकारी ,ठेकेदार यांच्यात बैठक झाली आणि उद्या पासून कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी पत्र एस टी विभागाचे रत्नागिरी जिल्हा विभागीय अभियंता सुरेश मोहिते यांनी दिल्यावर तालुका प्रमुख संदीप सावंत यांनी आपले आंदोलन तूर्तास मागितले आहे. त्यामुळे अखेर तालुका प्रमुख संदीप सावंत यांच्या सुरुवातीपासूनच लढ्याला यश आल्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले यावेळी आगार प्रमुख रणजित राजेशिर्के, शिरळ विभाग प्रमुख साहिल शिर्के,युवा सेना प्रमुख अवधूत शिर्के व राहुल पाष्टे उपस्थित होते..