Pune Land Scam : मुंडव्यातील वादग्रस्त जमीन घोटाळा प्रकरण; सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. या दाखल गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • पुणेच्या मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत.

  • दोन दिवसांपासून या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच या वादग्रस्त व्यवहाराचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली होती.

पुणेच्या मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत. दोन दिवसांपासून या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच या वादग्रस्त व्यवहाराचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु आता महसूल विभागाने स्पष्ट केलं आहे की, व्यवहार रद्द करण्यासाठीही कायदेशीर नियम लागू होतात आणि त्यानुसार पार्थ पवार यांना तब्बल 42 कोटी रुपयांचा भूरदंड भरावा लागणार आहे. महसूल विभागाच्या सूत्रांनुसार, या व्यवहारासाठी आधी 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले होते. आता हा व्यवहार रद्द करण्याची मागणी करण्यात येत असल्याने, नियमांनुसार व्यवहार रद्द करतानाही त्याच रकमेइतकं मुद्रांक शुल्क परत जमा करावं लागतं. म्हणजेच एकूण 42 कोटी रुपयांचा भार पार्थ पवारांवर पडणार आहे.

आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. या दाखल गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार शितल तेजवानी यांनी मिळून केला आहे मुंडवा येथील सरकारी जमिनीची खरेदी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com