छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये पहिली बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये पहिली बंदची हाक

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केलं होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळी राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरात संताप पसरलेला पाहायला मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर आता औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीवर चर्चा सुरु होती यावेळी बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होते. असे त्यांनी वक्तव्य केले.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत जाधव यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपला मस्ती चढली आहे. त्यामुळे यांचा निषेध म्हणून आज सर्वांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला पाहिजे. सत्ता आल्यावर वाटेल ते बोलणाऱ्या भाजपला कळू द्या अजून ते एवढे मोठे झाले नाही. त्यामुळे आज बंद म्हणजे बंद... महाराष्ट्र बंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com