Chhagan Bhujbal : 'मी कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही' ; छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ब्राह्मण महासंघासह राजकीय पातळीवरून देखील टीका होत आहे. यावर आज त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
Published by :
Team Lokshahi

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर टीका करताना भुजबळांनी हे विधान केलं. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ब्राह्मण महासंघासह राजकीय पातळीवरून देखील टीका होत आहे.

यावर आज त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. मला ब्राह्मण समाजाचा अपमान करायचा नव्हता, पण केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही, असं भुजबळ म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com