ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात; 132 प्रवासी जखमी

ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात; 132 प्रवासी जखमी

बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

ओडिशा : बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 132 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमी प्रवाशांना सोरो आणि गोपालपूर रुग्णालयात उपचारांकरीता हलवण्यात आले आहे. गंभीर जखमी प्रवाशांना अतिदक्षता विभागात पाठवले जाईल, असे ओडिशाच्या मुख्य सचिवांनी सांगितले.

ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात; 132 प्रवासी जखमी
श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर आधी थुंकले अन् आता सारवासारव; राऊत म्हणाले...

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. बहनगा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७.२० च्या सुमारास हा अपघात झाला. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. एसडीआरएफची टीमही घटनास्थळी हजर आहे. बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे आणि राज्य स्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com