coronavirus
coronavirusTeam Lokshahi

होळीवर कोरोनाचं सावट! एका आठवड्यात रुग्णसंख्या तिप्पट

देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. मात्र याआधीच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
Published by :
shweta walge

देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. मात्र याआधीच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसताना आता मात्र कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण नर्माण झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहेत. गेल्या 24 तासांत देशात 324 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या 300 होती, आज हीच रुग्ण संख्या 324 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 791 पर्यंत वाढली आहे.

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे सरकार आणि नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता वाढली आहे. आतापर्यंत देशात एकूण 5 लाख 30 हजार 775 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून केरळमध्येही एक एक दगावल्याची नोंद झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com