Coronavirus : भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नाही - अदार पूनावाला

Coronavirus : भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नाही - अदार पूनावाला

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. सर्व निर्बंध हटवल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. सर्व निर्बंध हटवल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला यांनी ट्विट केलं आहे. पूनावाला म्हणाले की, "चीनमधील कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपलं उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचं पालन केलं पाहिजे," असे त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com