पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग सुरु होणार
Admin

पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग सुरु होणार

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.पुणे विमानतळावर दुबई, सिंगापूर आणि बँकॉकसाठी प्रत्येकी एकासह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. सिंगापूर आणि बँकॉकची उड्डाणे गेल्या महिन्यात जोडण्यात आली होती, तर दुबईची फ्लाईट बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहे. आयटी हब असल्याने शहरात अनेक कंपन्या आहेत ज्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत. याशिवाय अनेक परदेशी विद्यार्थीही पुण्यात शिक्षण घेतात. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पीएमसीच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ आशिष भारती यांनी सांगितले की, आम्ही गुरुवारपासून विमानतळावर आमच्या अधिकार्‍यांची एक टीम तैनात केली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला थर्मल स्क्रीनिंग करावी लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com