Raj Thackeray, sharad Pawar
Raj Thackeray, sharad PawarTeam Lokshahi

आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि.... मनसेचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनी केलेल्या राज ठाकरे यांच्यावरील टिकेनंतर मनसे आमदार राजू पाटिल यांचं प्रत्युत्तर
Published by :
shweta walge
Published on

अमजद खान, कल्याण : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे, दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका केली होती. मनसे आणि शरद पवारांमध्ये शाब्दिक युध्द झाले.

मनसेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला. शरद पवार यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं?", अशा शब्दात खोचक टोला लगावला.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट शरद पवार यांना ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल....आणि परवा बोटं तोंडात घालाल,आम्ही "धन"से कमी आहोत पण "मन"से लई आहोत,मौका सबको मिलता है, आदर देतोय आदर घ्या असा सल्ला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com