Dhananjay Munde: आताची मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस, कारवाई होणार?
बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच हत्याप्रकरणी धनंजय मुंडे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. असं असताना त्यांच्या अडचणीत वाढ होताना कायम दिसत आहे. यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर याबाबत परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे, यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे. यासंदर्भात 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.
मात्र, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीसंदर्भात कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. त्यावरूनच न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिला, तक्रारीची दाखल घेत आता त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

