Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप; आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Abdul Sattar) छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. प्रचाराच्या शेवटच्या सभेत मतदान न करणाऱ्या मतदारांवर रामबाण उपाय करण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.
याप्रकरणी सी-विजिल ॲप व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने सिल्लोड न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व अन्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप
आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस
सत्तारांसह,जिल्हाधिकारी आणि 3 अधिकाऱ्यांना नोटीस
