उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये सामंजस्य करार, दीड हजार रोजगार निर्मिती, उदय सामंतांची माहिती

उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये सामंजस्य करार, दीड हजार रोजगार निर्मिती, उदय सामंतांची माहिती

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे लि. यांच्यात आज सामंजस्य करार झाला.
Published on

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे लि. यांच्यात आज सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत १ हजार कोटी गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात डिफेन्स प्रदर्शन कम सेमिनारचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. निबे कंपनी रत्नागिरीमध्ये 1 हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. त्यामधून एक ते दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे. बंदूक हातात घेऊन सीमेवर राहूनच देशसेवा करता येते असे नाही, संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. असे यावेळी पालकमंत्री उद्या सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com