"4.75 कोटींची गुंतवणूक केली असती तर...", युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर युवराज सिंहच्या वडिलांचा टोला
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल हा सध्या त्याच्या घटस्फोटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएंसर धनश्री वर्मासोबत तो लग्नबंधनात अडकला होता. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. धनश्री आणि युझवेंद्र यांनी कौटुंबिक सत्र न्यायालयामध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यावर 20 मार्च रोजी त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला.
घटस्फोटानंतर युझवेंद्रने 4.75 कोटी रुपयांची पोटगीदेखील देण्याचे कबूल केले आहे. यावरुनच आता भारतीय क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी भाष्य केले आहे. योगराज सिंह म्हणाले की, "जर चहलने लग्न करताना ४.७५ कोटींची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्याकडे ८ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली असती. मी तुम्हा सर्वांना अविवाहित राहण्याचा आणि काही तरी करण्याचा सल्ला देईन". योगराज यांचे वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आले आहे.
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. घटस्फोटापूर्वी युजवेंद्र चहलने धनश्रीला २.३७ कोटी रुपये दिल्याचे बोलले जात आहे. तर घटस्फोट झाल्यानंतर २.३८ कोटी रुपये देण्यात आले.