Nagpur : नागपुरातील तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू; बंदोबस्त तैनात
नागपूरमध्ये दोन गटात मोठा तणाव झाला. दोन गट समोरासमोर आल्याने नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटात दगडफेक झाली. यामध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल असून पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागपुरातील तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. रात्री 1 वाजता काढले संचारबंदीचे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेल्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून गणेशपेठेसह तहसील, शांती नगर, सक्करदरा, इमामवाडा, नंदनवन, यशोधरा नगर, कपिल नगर या हद्दीत देखील जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.