Ajit Pawar : दादा आमच्या बांधावर या..., काय म्हणाले अजितदादा पूरग्रस्तांना ?

Ajit Pawar : दादा आमच्या बांधावर या..., काय म्हणाले अजितदादा पूरग्रस्तांना ?

आज सर्वच मंत्र्यांचे पायं शेतकऱ्यांच्या बांधाकडे वळले आहेत. आज सोलापुरातील संगोबा गावातील नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी पाहणी केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • महिलेने अहो, दादा आमच्या बांधावर या, पूरग्रस्तांची दादानां मागणी

  • सर्वच मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश

  • 14 सप्टेंबरनंतरच्या नुकसानीचे पंचनामे आल्यावर मदत मिळणार

मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदत देण्याची मागणी होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वच मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज सर्वच मंत्र्यांचे पायं शेतकऱ्यांच्या बांधाकडे वळले आहेत. आज सोलापुरातील संगोबा गावातील नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी पाहणी केली. यावेळी अजित पवार माध्यमांशी संवाद साधत असतानाच एका नुकसानग्रस्त शेतकरी महिलेने अहो, दादा आमच्या बांधावर या, अशी आर्त हाक दिली. त्यावर तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचा शब्दच अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार यांनी आज सोलापुरातील सीना नदीकाठच्या गावांची पाहणी केली. यावेळी अजित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच गेल्याचं चित्र दिसून आलं. अजित पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, 14 सप्टेंबरनंतरच्या नुकसानीचे पंचनामे आल्यावर मदत मिळणार आहे. लवकरात लवकर मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत आम्ही माहिती घेऊन मदत देणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

याचदरम्यान, ज्या ठिकाणाहून अजित पवार माध्यमांशी बोलत होते, त्यामागेच काही शेतकरी अजित पवार यांची वाट पाहत होते. मात्र, कोणतंही वाहन नसल्याने अजित पवार यांना तिथल्या शेतकऱ्यांच्या जवळ जाता आलं नाही. ट्रॅक्टर असता तर मी तुमच्याकडे आलो असतो असंही याबाबत अजित पवार यांनी सांगितलं. याचवेळी एका महिलेने अजितदादांना हाक दिली, त्यावर अजित पवार म्हणाले, तुमचं जे काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई आम्ही देणार आहोत, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, अजित पवार यांनी संगोबा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून, शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालं आहे, याबद्दलची माहिती घेतली आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह जमीनीही वाहून गेल्याचं चित्र अजितदादांना पाहायला मिळालंय. या पूरग्रस्त भागात बचावकार्याने दखल घेत नागरिकांचे जीव वाचवले आहेत. त्याबद्दल बचावकार्य करणाऱ्यांचे अजिततोदादांनी कौतूक केले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये मंजूर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडून 2215 कोटी रुपये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केलीयं. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पुढील 8 ते 10 दिवसांत रक्कम जमा करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ओला दुष्काळच कायय तर ज्या ठिकाी नुकसान झालंय त्या ठिकाणी पाहिजे ती मदत देणार असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीयं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडून 2215 कोटी रुपये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केलीयं. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पुढील 8 ते 10 दिवसांत रक्कम जमा करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ओला दुष्काळच कायय तर ज्या ठिकाी नुकसान झालंय त्या ठिकाणी पाहिजे ती मदत देणार असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीयं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com