Dadar Ideal Dahi handi : दादरमधील आयडियलची मानाची दहीहंडी महिला गोविंदा पथकाने फोडली

Dadar Ideal Dahi handi : दादरमधील आयडियलची मानाची दहीहंडी महिला गोविंदा पथकाने फोडली

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published on

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत.

राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आनंद असतो.

दादरमधील आयडियलची मानाची दहीहंडी महिला गोविंदा पथकाने फोडली आहे. दादरमध्ये आयडियलची दहीहंडी ही मानाची मानली जाते. आयडियलच्या दहीहंडीचं यंदा 50वं वर्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com