Dahi Handi 2025 : दादरच्या दहीहंडीत लोकशाही मराठीचा सहभाग! गोविंदांबरोबर मनोरा रचत दिली अप्रतिम सलामी

दादरमधील 'आयडियल'मधील दहीहंडीत महिला गोविंदा पथकासह मिळून लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी देखील थरावर चढत सलामी दिली आहे.
Published by :
Prachi Nate

कृष्णा जन्म झाल्यानंतर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. यातच मुंबई येथील आयडियल डेपो जवळील महिलांसाठी लावलेली दहीहंडी ही प्रसिद्ध दहीहंडी उत्सवापैकी एक मानली जाते. साधारण दहा वाजेपर्यंत ही दहीहंडी महिलांच्या ग्रुप तर्फे फोडण्यात येते.

आता हळूहळू या ठिकाणी महिला पथक येण्यास सुरुवात झाली असून महिला पथकाकडून सामाजिक संदेश देणारे पथनाट्य देखील सादर करण्यात येत आहेत. दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. दादरमधील 'आयडियल'ची दहीहंडी प्रसिद्ध आहे आणि ती मानाची समजली जाते.

येथे महिला गोविंदा पथकेही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज असतात याच वेळी यासगळ्याचा आढावा घेत असताना लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी देखील तिथे उपस्थित महिला गोविंदा पथकासह मिळून मनोरा रचत, थरावर चढत अप्रतिम अशी सलामी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com