Dahisar : एकसर भूखंड प्रकरण ; महापालिकेचा 349 कोटींचा भूखंड अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत

महापालिकेच्या भूखंडाचा विकास थांबला; 349 कोटींचा खर्च वाया?
Published by :
Shamal Sawant

एकसर गावात महापालिकेचा जवळपास सात एकरचा भूखंड अद्यापही खितपत पडला आहे. विकासक अल्पेश अजमेरा यांच्याकडून जवळपास साडेतीनशे कोटी रुपये देऊन विकत घेतलेला हा महापालिकेच्या भूखंड यावर अद्यापही महापालिकेकडून प्रस्तावित हॉस्पिटल किंवा खेळाच्या मैदानाबाबत कोणत्याही पावलं उचलली जात नाहीयेत. लोकशाही मराठीने हा मुद्दा उचलून धरला होता. हाच मुद्दा काल रात्री उशीरा सुरु असलेल्या सभागृहात भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी उपस्थित केला आणि हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं. हे प्रकरण नेमकं काय आहे

झोपडपट्टी असलेला हा सात एकरचा भूखंड 2.97 कोटी रुपयांना दहिसर एक्सर गावातील विकासक अजमेरा यांनी खरेदी केली होती. पण हीच जमीन महापालिकेनं कोवीड काळात अजमेराला 349 कोटी देऊन विकत घेतली. बरं घेतली ती घेतली ही जमीन झोपडपट्टीधारकांसाठी होती. अशा या जमिनिची 349 कोटींच्या घरात इतकी चढ्या दरानं विक्री का? महापालिकेकडून या जागेवर रुग्णालय आणि खेळाचं मैदान तयार करण्याचा मानस होता.

पण दुर्दैवानं ते केवळ भासवण्यातच आलं. आज जर का कोवीड काळात तिथे रुग्णालय झालं असतं तर दहिसर-बोरिवलीमधील वाढत्या लोकसंख्येला एक आधार देणारं रुग्णालय तयार झालं असतं. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा अधिवेशन होतं. तेव्हा तेव्हा आमदार मनीषा चौधरी हा मुद्दा उपस्थति करतात,SIT चौकशीची मागणी करतात त्याचप्रमाणे अहवाल सादर करण्यासदेखील सांगितले जाते.

एकेकाळी 2.97 कोटींची ही जागा 349 कोटी रुपयांना विकत घेतली जातेच कशी? आणि दुसरा मुद्दा वारंवार SIT मागणी करुनही अहवाल सादर का केला जात नाही असे प्रश्न आता उपस्थित राहताना दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com