Honour Killing : तामिळनाडूत ऑनर किलिंगचा बळी; बहिणीशी प्रेमसंबंध असल्यानं दलित IT अभियंत्याला भावानं संपवलं

Honour Killing : तामिळनाडूत ऑनर किलिंगचा बळी; बहिणीशी प्रेमसंबंध असल्यानं दलित IT अभियंत्याला भावानं संपवलं

चेन्नई येथील सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या 27 वर्षीय दलित IT अभियंता केविन सेल्वा गणेश याची ऑनर किलिंगच्या प्रकरणात निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

चेन्नई येथील सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या 27 वर्षीय दलित IT अभियंता केविन सेल्वा गणेश याची ऑनर किलिंगच्या प्रकरणात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केविन आणि सुबाशिनी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र सुबाशिनीचा भाऊ सुरजीन याला हे संबंध मान्य नव्हते. यामुळे सुरजीतनं केविनची हत्या केली. केविनवर रविवारी 27 जुलै तिरुनेलवेली जिल्ह्यातील सिद्धा सेंटरजवळ त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

केविन सेल्वा गणेशची हत्या आरोपी सुरजीत याने केली असून, तो स्वतः पोलीस उपनिरीक्षक (SI) दाम्पत्याचा मुलगा आहे. पोलिसांनी सुरजीतला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याचे पालक सरवनन आणि कृष्णकुमारी हे दोघेही पोलीस विभागात SI पदावर कार्यरत असून, घटनेनंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या हत्येमुळे तामिळनाडूतील सत्ताधारी DMK सरकारच्या सहकारी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. VCK पक्षाचे नेते थोल थिरुमावलवन यांनी या अमानुष हत्येच्या निषेधार्थ विशेष कायद्याची मागणी केली. त्यांनी आरोपी सुरजीतच्या पालकांना अटक करून त्यांची पोलीस सेवेतील बडतर्फी करण्याचीही मागणी केली. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याची गरज असल्याचे सांगितले.

CPIM पक्षाचे राज्य सचिव पी. शन्मुगम यांनीही ऑनर किलिंगविरोधात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली आहे. "दक्षिण तमिळनाडूत अशा जातीअधारित हत्यांच्या घटना सतत घडत आहेत. सरकार म्हणते की विद्यमान कायदे पुरेसे आहेत, पण अशा घटनांची पुनरावृत्ती ही वेगळ्या कायद्याची गरज अधोरेखित करते," असे शन्मुगम यांनी स्पष्ट केले.

केविन सेल्वा गणेशच्या पालकांनी सरकारकडून देण्यात आलेली मदतनिधी नाकारली असून, त्यांनी फक्त आरोपीच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सुरजीत आणि त्याच्या पालकांवर BNS (भारतीय न्याय संहिता) आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तामिळनाडूमध्ये वाढत्या ऑनर किलिंगच्या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले असून, सामाजिक संस्था आणि मानवाधिकार संघटनांनी या पार्श्वभूमीवर तातडीने कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

Honour Killing : तामिळनाडूत ऑनर किलिंगचा बळी; बहिणीशी प्रेमसंबंध असल्यानं दलित IT अभियंत्याला भावानं संपवलं
Rahul Gandhi : 'ऑपरेशन सिंदूर' ही कारवाई की केवळ राजकीय स्टंट'; राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com