Shivaji Park
Shivaji ParkTeam Lokshahi

Dasara Melava : यंदाच्या दसऱ्याला शिवाजी पार्क मोकळेच राहणार ?

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा होणार की शिंदे गट यावरुन वाद सुरु

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा होणार की शिंदे गट यावरुन वाद सुरु असतानाच यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहण्याची शक्यता आहे.

कारण, वादग्रस्त मुद्द्यामुळे शांतता सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई महापालिका शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या अर्जाला नकार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना कुणाची हा वाद, तसंच सध्याची दादर प्रभादेवीमधील तणावाची स्थिती यांमुळे शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने कोणत्याही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देऊ नये असे मत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी ठिकठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत होते.

Shivaji Park
राज ठाकरे यांना युतीत घेण्यास रामदास आठवले यांचा विरोध
Lokshahi
www.lokshahi.com