ताज्या बातम्या
पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं भाष्य; म्हणाले...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची. पालकमंत्रिपदावरुन आता रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे भाष्य केलं आहे. मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कुणी काहीही म्हणू द्या. या जिल्ह्याचे पालकमंत्री अजिदादा पवार साहेबच होतील.
दत्तात्रय भरणे यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आले असून पुण्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांना मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.