ताज्या बातम्या
"त्यांच्या विचारांना वाळवी म्हणून पक्षात आले राजन साळवी", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात
राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची जोरदार बॅटिंग
राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचं शिवधनुष्य साळवी यांनी हाती घेतलं. राजन साळवी यांच्याबरोबरच अनेक कार्यकर्त्यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले तसेच भावनादेखील व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी असा खोचक टोला सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी लगावला. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे संजय राऊत यांनी नाराजी दर्शवली होती. त्यामुळे मराठी माणूसच मराठी माणसाला पाठिंबा देत नाही. असेही ते म्हणाले.