Swati Maliwal
Swati Maliwal Team Lokshahi

'माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे' महिला आयोग अध्यक्षांच्या खळबळजनक वक्तव्य

असा गंभीर आरोप त्यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना केला.

अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी वडिलांवर लैंगिक शोषण केल्याचा आता स्वाती मालीवाल यांनीही असाच आरोप केला. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहे. माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे. तसेच रागात ते मला खूप मारहाण देखील करायचे. असा गंभीर आरोप त्यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना केला.

काय नेमकं स्वाती मालीवाल म्हणाल्या?

“मला आठवतंय की, माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे. ते घऱी यायचे तेव्हा मला खूप भिती वाटायची. मी अनेक रात्री खाटेखाली लपून घालवल्या आहेत. मी घाबरून थरथर कापायचे. तेव्हा मी विचार करायचे की, मला असं काय करता येईल ज्याने मुलींवर अत्याचार करणाऱ्या या लोकांना धडा शिकवता येईल. माझे वडील घरी यायचे तेव्हा ते खूप रागात असायचे. त्यांच्या मनाला वाटेल तसं वागायचे.” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्षपद हे 2015 पासून त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com