Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना नोव्हेंरचा हफ्ता 'या' दिवशी मिळणार
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा गरीब घरातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. लाडकी बहीण ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. दरम्यान आता या योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व पात्र महिला लाभार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे अचारसंहिता सुरू आहे.
लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट
लाडक्या बहिणींना नोव्हेंरचे पैसे अद्याप न मिळाल्याने चिंतेचं वातावरण होतं, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्याने आचारसंहिताही सुरू आहे. त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार, आत्ता मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात घुमत होते. पण आता काळजीचं कारण नाही. निवडणूक आचारसंहितेचा परिणाम माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवरहोणार नाही अशी माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट मिळणार आहे. प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यानुसार, जर उशीरा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला तर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात ‘डबल गिफ्ट’ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
ई-केवायसी बंधनकारक
पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि पैसे मिळवण्यासाठी आता ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर मिळणारे पैसे रोखण्यात येऊ शकतात. ईकेवायसी पूर्ण न झाल्यास या योजनेचा आत्तापर्यंत लाभ घेणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. सलाडप्टेंबर महिन्यात ई-केवायसीची घोषणा करण्यात आली होती, त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. लाखो महिलांचे ई-केवायसी मात्र तोपर्यंत पूर्ण झाले नव्हेत, विविध कारणांमुळे ते रखडले होते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यामुळे आता मुदत वाढवण्यात आली असून आता पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
