ताज्या बातम्या
Whale Fish Rescue : गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या व्हेल माशाचा मृत्यू
गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या व्हेल माशाचा मृत्यू
गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या व्हेल माशाचा मृत्यू झाला आहे. गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ सोमवारी जिवंत व्हेल मासा आला होता. त्याला वाचवण्यासाठी ग्रामस्थांसह वनविभागाचे कर्मचारी दोन दिवस प्रयत्न करत होते. अखेर या व्हेल माशाला समुद्रात सोडण्यात आलं. मात्र काल पुन्हा तो समुद्रकिनारी आला. उशिरापर्यंत या माशाच्या रेस्क्यूचं काम सुरू होतं.
व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामस्थांची कसरत सुरू होती. कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत दोन जेसीबी आणि एका बोटींच्या साह्याने व्हेलला खोल पाण्यात नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते.