बातम्या
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
शरद पवारांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्व्हर ओकवर फोन करुन पवारांना धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली असून पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील आॅपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात 294, 506(2) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
