Sham Manav
Sham ManavTeam Lokshahi

अंनिसच्या श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसात गुन्हा दाखल

धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

मागील काही दिवसांपासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव प्रचंड चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी धिरेंद्र महाराजांना आव्हान दिल्यापासून ते प्रकाश झोतात आले आहे. त्यातच त्यांना आज जिवे मारण्याची धमकी आली आहे. या आधी देखील त्यांना धमकी आली होती. तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

Sham Manav
पवारांवर केलेल्या आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले, सहन करणार...

मात्र, आता पुन्हा एकदा त्यांना धमकी आली आहे. धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी पुण्यातील हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षितिज यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संदेश पाठविला. संदेशात शिवीगाळ करण्यात आली आहे. घरावर बाँब फेकून श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी संदेशात देण्यात आली आहे. या प्रकरणाचा हिंजवडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com