शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर आज   समितीची बैठक; काय होणार निर्णय?

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर आज समितीची बैठक; काय होणार निर्णय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज प्रदेश कार्यालयात बैठक आहे. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या बैठकीत नेमका काय ठराव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com