एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे, दीपक केसरकर यांची नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर टीका केली आहे.
केसरकर म्हणाले की, भारतातील राज्यांनी अनेक असे निर्णय घेतले आहेत की त्यामुळे ही राज्य दिवाळखोर होणार आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करायचं की हिताचं राजकारण करायचं हे त्या त्या राज्याने ठरवायचं असतं, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र मोठा आहे. राज्यात पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने मुंबईत आले. प्रत्येक दौऱ्याची आणि खर्चाची सरकार दरबारी सर्व नोंद असते. सरकारचं ऑडिट स्ट्रिक्ट असतं. ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असं बोलत असतात. असे ते म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केले, त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरही केसरकर यांनी उत्तर दिलं. त्यांनी जेव्हा दावोसला जाऊन करार केले, तेव्हा त्यांच्यावेळी महिंद्रा कंपनी होती. ती काय आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनी आहे का? युवकांना मॅच्युरीटी असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टड फ्लाइटने गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. पंतप्रधानांचा दौरा असताना ही टीका करणं चुकीचं आहे. थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नका. डोक्यात एवढा राग घेऊ नका. थोडं शांत व्हा, असे दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.