'घडल ते वाईट आहे, पण...' शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी केसरकरांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पंरतु,एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या घटनेमुळे संपुर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात असून शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. यातच आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की,
मुख्यमंत्री यांनी एक बैठक घेतली, अनेक नामांकित पुतळा बनवणाऱ्या लोकांची बैठक घेतली, यात चागलं पुतळा बनवला जाईल. चूक अपघात घडू शकतो, नेव्ही बरोबर शासनाने ठामपणे उभा राहील पाहिजे. भव्यदिव्य स्मारक बनवायचा असतो. प्रत्येक गोष्ट शब्दात पकडायचे नसते, तांत्रिक बाबीवर काम सुरू आहे,दोषींना सोडले जाणार नाही,भ्रष्टाचार कसा झाला आपण काय बोलता,नेव्ही बद्दल अस बोलता कामा नये,महाराजांचा पुतळा उभा राहिला पाहिजे, सर्वांना अभिमान आहे,दोषारोप करता कामा नये, चुकल असेल त्याच्यावर कारवाई केली जाई,आता कृती करायची आहे.
पुतळा भव्य झालं पाहिजे, मी कमिटीच्या निदर्शनास सगळ आणून दिल आहे. घडल ते वाईट आहे, पण यातून चांगल भव्यदिव्य पुतळा घडला जावा ही अपेक्षा आहे. जे घडलं ते वाईट आहे त्यानंतर चांगले घडेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तानाजी सावंतावर टीका करत म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी बोलावले असेल तर महायुतीमध्ये कोणी बोलू नये असच आहे. महायुती वेगाने काम करते,अनेक योजना आहेत जे सरकार देत आहेत. या सगळ्या योजनांमध्ये पाणी योजना जास्त राबवल्या गेल्या,अस म्हणण्याचं काही कारण नाही. अजित दादा कार्यक्षम मंत्री आहेत. त्याच्यामुळे राज्याला फायदा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले होते की, राष्ट्रवादीशी कधीच जमलं नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो, तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं तानाजी सावंत म्हणालेत.