Admin
बातम्या
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी सरळ सांगून टाकले...
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तसे झाले नाही.
यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर म्हणाले की, मंत्रीपद वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार आहे. असे दिपक केसरकर म्हणाले.