…तर आम्ही आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ? शिंदे गटाच्या या मंत्र्यांने केलं मोठे वक्तव्य

…तर आम्ही आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ? शिंदे गटाच्या या मंत्र्यांने केलं मोठे वक्तव्य

ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट नेहमीच एकमेकांवर आरोप करताना दिसतात.

ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट नेहमीच एकमेकांवर आरोप करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर आता , शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचं मन जिंकलं आहे. त्यामुळेच सर्व आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यावेळी काय झालं हे मी सांगणार नाही. कारण ते मी मनाच्या कोपऱ्यात दडवून ठवलं आहे. त्यामुळे एक ते दोन दिवस जाऊ द्या. ज्यावेळी मी बोलेन तेव्हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजणार .

तसेच ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी लढा दिला. ते लोक इतक्या सहजासहजी शिवसेना सोडून जाणार नाहीत. तसेच निश्चितपणे काहीतरी घडल्याशिवाय आमदार शिवसेना सोडणार नाहीत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास आम्ही आणि शिवसेना एकत्र येण्याला वेळ लागणार नाही. असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com