Deepak Kesarkar
Deepak KesarkarTeam Lokshahi

तुम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बाजूला करा - दीपक केसरकर

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि पक्ष गेल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. आमचा पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. माझ्या वडिलांचं नावही चोरलं. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांचं नाव घेऊन निवडणुकीला सामोरे जा. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरल्याशिवाय आता मोदींनाही मते मिळत नाहीत. असे उद्धव ठाकरेंनी शिवसेनासह भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली.

यावर प्रतिउत्तर देत दिपक केसरकर म्हणाले की, आम्ही नाही. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले त्यामुळे तुम्हीच त्यांचं नाव बाजूला करा.आजही तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाताय. ज्या शरद पवारांनी अनेकदा शिवसेना फोडली त्यांच्याबरोबर तुम्ही जाताय. जे काही गेलं त्यामागे तुम्ही घेतलेले निर्णय कारणीभूत आहेत. सहानुभूतीची खोटी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जागे व्हा, असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com