राहुल गांधींविरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?
Admin

राहुल गांधींविरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधींविरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राहुल गांधींविरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा करण्यात आला आहे. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. ब्रिटनमधील विधानावरुन हा खटला दाखल केला आहे.

सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की ते आणि त्यांचे पाच सहा मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद सावकरांना होत होता. तर या सर्व गोष्टीला कायरता म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ही त्यांची आणि आरएसएसची मेंन्टॅलिटी आहे. असे राहुल गांधी म्हणाले होते.

यावर सावरकरांचे नातून सात्यकी सावरकर म्हणतात की, त्या सगळ्या भाषणामध्ये सावरकरांना ओढून - ताणून आणायचे काही कामच नव्हते. राहुल गांधी जो कोणता प्रसंग सांगत आहेत तो काल्पनिक आहे. सावरकरांसारखा मोठा माणूस असे लिखाण करुच शकत नाही. त्यामुळे हा सर्व प्रसंग खोटा आहे. आणि त्याच्याविरोधात काहीतरी केलं पाहिजे. असे सात्यकी सावरकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com