Washim
WashimTeam Lokshahi

Washim: 7 महिन्यापासून बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यास विलंब

वाशिम जिल्हा पोलीस विभागात प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 18 ओक्टोबर 2022 रोजी करण्यात आल्या होत्या.
Published by :
shweta walge

गोपाल व्यास, वाशिम; वाशिम जिल्हा पोलीस विभागात प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 18 ओक्टोबर 2022 रोजी करण्यात आल्या होत्या. परंतु अनेक पोलीस ठाण्यांत बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले तर काही पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची गुप्त माहिती सह बदलीचे पत्र पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकशाही मराठी न्युजला दिले.

जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन तब्बल 7 महिने उलटले मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यासाठी पोलीस अधीक्षक ठोस भूमिका घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस दलात बदली दरम्यान देवाण घेवाण करीत अनेक पोलीस कर्मचारी बदल्या होताना चर्चा असते? त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी याची प्रशासकीय बदली होऊन त्यांना अद्याप पर्यंत सोडण्यात आले नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत असून याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहमंत्री यांनी सुद्धा लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com