Delhi Mundka Fire
Delhi Mundka FireTeam Lokshahi

Delhi Mundka Fire : दिल्लीतील आगीतील मृतांची संख्या 27

आग लागल्यानंतर अनेकांनी दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर उड्या मारल्या.
Published by :
Sudhir Kakde

दिल्ली : दिल्लीतील मुंडका इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत मृतांची संख्या 27 झाली आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या मजल्याचा शोध घेणे बाकी आहे. या इमारतीत सध्या अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. इमारतीत अडकलेल्या 9 जखमींना संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंडका परिसरात लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. इमारतीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. (27 Died in Delhi Mundka Fire)

Delhi Mundka Fire
Photo दिल्लीतील आगीतील तांडवानंतरची भीषण दृश्य

शुक्रवारी दुपारी 04.45 वाजता कार्यालयात आग लागल्याच्या घटनेबाबत मुंडका पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्यांनी इमारतीच्या खिडक्या तोडून लोकांना बाहेर काढलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेतील जखमींचा आकडा मोठा असून, तो वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जातेय.

Delhi Mundka Fire
Mumbai-Goa महामार्गावर बर्नींग बसचा थरार; काही मिनिटांत बस जळून खाक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com