दिल्ली महापालिकेवर कोणाचा झेंडा? आज होणार स्पष्ट, मतमोजणीला सुरुवात

दिल्ली महापालिकेवर कोणाचा झेंडा? आज होणार स्पष्ट, मतमोजणीला सुरुवात

आज दिल्ली महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आज दिल्ली महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपनं तब्बल सात मुख्यमंत्री, 17 कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले होते. मात्र, एक्झिट पोलनुसार आप या निवडणुकीत भाजपचा पराभव करेल असं सांगण्यात आलं आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिल्लीत 13 हजार 638 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान झाले होते. आजच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्यांसह 10,हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत.

या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाजी मारुन कुणाचा झेंडा दिल्ली महानगरपालिकेवर फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी तीन वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com