Rahul Gandhi Team Lokshahi
बातम्या
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेतील वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांची राहुल गांधींना नोटीस
भारत जोडो यात्रेतील वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांची राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे.
भारत जोडो यात्रेतील वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांची राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान मी एका बलात्कार पीडितेला भेटलो होतो, त्यावेळी मी त्या मुलीला आपण पोलिसांना बोलावूयात का असे विचारले, तेव्हा तिने माझी बदनामी होईल म्हणत फोन करण्यास नकार दिला.
तसेच यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महिलांच्या छेडछाडीबाबत अनेक विधाने केली होती. यावरुनच दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये ज्या पिडीत महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची किंवा शारीरिक अत्याचाराची व्यथा राहुल गांधी यांच्याकडे मांडली आहे, त्या महिलांची यादी राहुल यांनी पोलिसांना द्यावीत. असे त्यात लिहिले आहे.