ताज्या बातम्या
Mhada Corruption : Lokशाही मराठीच्या बातमीचा Impact; संरक्षक भिंत कामात घोटाळा, दानवेंची चौकशीची मागणी
लोकशाही मराठीच्या बातमीचा परिणाम; संरक्षक भिंत कामात घोटाळा, दानवेंची चौकशीची मागणी.
लोकशाही मराठीच्या बातमी दखल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घेणार आहेत. "अशा अनेक प्रकरणात बिले निघाली असून कामच झालेले नाही, त्यामुळे या प्रकरणी चौकशी व्हायला हवी", अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे. लोकशाहीची कालची बातमी ज्यात चेंबूर परिसरातील 379 संरक्षक भिंती कागदावरच असल्याची माहिती देण्यात आली होती. या बातमीनंतर आता या सगळ्या प्रकरावर मुंबई झोपडपट्टी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी लाटल्याचा आरोप करण्यात येत असून आता चौकशीची मागणी जोर धरते आहे.