Abir Gulal Film : पाकिस्तानी कलाकाराच्या चित्रपट प्रदर्शनाला कडाडून विरोध; 'अबीर-गुलाल'वर बंदी?

Abir Gulal Film : पाकिस्तानी कलाकाराच्या चित्रपट प्रदर्शनाला कडाडून विरोध; 'अबीर-गुलाल'वर बंदी?

पाकिस्तानी कलाकार फवाद खान अभिनीत 'अबीर गुलाल' हा हिंदी चित्रपट येत्या ९ मे रोजी भारतात प्रदर्शित होणार असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

पाकिस्तानी कलाकार फवाद खान अभिनीत 'अबीर गुलाल' हा हिंदी चित्रपट येत्या ९ मे रोजी भारतात प्रदर्शित होणार असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. नुकतेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकाराच्या या चित्रपटाला विरोध होत आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे प्रदर्शकांना त्याच्या भवितव्याबद्दल चिंता वाटत असल्याने त्याची रिलीज तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वीही 'अबीर गुलाल' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी मनसेने राज्य सरकारला निवेदन दिले जाणार असल्याचे म्हटले होते. मनसे चित्रपट सेचेने प्रमुख अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. प्रथम निवेदनातून चित्रपट प्रदर्शित न होण्याची मागणी करू, नाही ऐकल्यास आमच्या स्टाईलने याला उत्तर देऊ, असा इशारा यावेळी अमेय खोपकर यांनी दिला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शन आरती ए. बागडी यांनी केले असून इंडियन स्टोरीज आणि ए रिचर लेन्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. निर्मात्यांमध्ये विवेक बी. अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी यांचा समावेश आहे. फवाद खान, वाणी कपूर, रिद्धी डोगरा, लिसा हेडन, फरीदा जलाल, सोनी राझदान, परमीत सेठी आणि राहुल वोहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात भारत आणि ब्रिटनमधील सहाय्यक कलाकार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com