Municipal Elections : ठरलं तर मग! आगामी निवडणुकाबाबत महायुतीची रणनीती
Municipal Elections : ठरलं तर मग! आगामी निवडणुकाबाबत महायुतीची रणनीती, नेमंका कसा फॉर्म्युला जाणून घ्या... Municipal Elections : ठरलं तर मग! आगामी निवडणुकाबाबत महायुतीची रणनीती, नेमंका कसा फॉर्म्युला जाणून घ्या...

Municipal Elections : ठरलं तर मग! आगामी निवडणुकाबाबत महायुतीची रणनीती, नेमंका कसा फॉर्म्युला जाणून घ्या...

मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबतचा संभ्रम काही अंशी दूर झाला आहे.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबतचा संभ्रम काही अंशी दूर झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेबाबत अद्याप निर्णय झाला नसून, महायुती एकत्र लढू शकेल का याचा आढावा घेतला जाणार आहे. विरोधक मजबूत असलेल्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र येण्याची तयारी असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, महाविकास आघाडीची भूमिका अजून स्पष्ट नाही. तसेच मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून, राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील आगामी स्थानिक निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com